प्रेमाची नशा तरी की असते ?
तू अन मी न सांगताही
भेटायला येण्याची ती ओढ असते.
नजरेला नजर भिडताच
तुझी मंद स्मित देण्याची ती अदा असते.
त्या अदेन घायाळ होऊन
मी मलाच विसरण्याची ती किमया असते.
मग नजरेला नजर बोलते...
शब्द नकळत मुके होतात...
वावरणाऱ्या जगापासून दूर
आपलं जग बनवणारी ती कल्पना असते.
कल्पनेच्या या दुनियेत खर जग विसरतोच आपण
सर्वकाही विसारावणार ते एक प्रेमगीत असते.
***प्रशांत नागरगोजे ***
btful
dhanyawad mahesh
तुला पाहता आजही
जीव माझा गुंतला
रोज नव्याने फुलतो आजही
आपल्या नात्यातला गोडवा
बरसूनी मेघ कसे हे आले
तुझ्या प्रीतीत मन हे नाहले
वेड लावते मला आजही
तुझ्या नजरेतल्या खाना खुणा
तुला पाहता आजही
जीव माझा गुंतला
तुझ्या माझ्या संसारातील अता
रुस्व्या फुगव्यात ही, जीव माझा गुंतला..
युगान युगाच्या नात्यात आजही
नव्याने, जीव माझा गुंतला
तुला पाहता आजही
जीव माझा गुंतला......
@ vrushali