Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Gambhir Kavita => Topic started by: balrambhosle on April 19, 2012, 06:16:33 PM

Title: घास....
Post by: balrambhosle on April 19, 2012, 06:16:33 PM
का रे जिव घेतला माणसा.........
का रे जिव घेतला...
माझ्या पिलांच्या उरात
भुकेचा जाळ तू चेतिला

माझी उपाशी पिलांच्या
घास तू छिनला...
दीर्घ वाळवंट ओलांडूनि..
जो घास मी शोधिला...
तुझ पोट भरन्याशी
माझा जिव तू तोडीला..

का रे जिव घेतला माणसा..
का रे जिव घेतला..

दिड दिवसांची रे ती पिले
जशी नाजुक गुलाबाची फुले..
तू झटक्यात त्यांना मोडिले..
माझे जीवन धागे तोडिले..

दोन दाण्याचा तो घास..
माझ्या लेकराची आस..
तू रोकिला माझा श्वास..
सांग कोण घेईल त्यांना उरास..

का रे जिव घेतला माणसा
का रे जिव घेतला..
माझ्या पिलांच्या उरात
भुकेचा जाळ तू चेतिला ....

डोळे मिटवुनी ती पिले
फ़क्त मलाच हाक मारी..
नाही मज शिवाय कुणी..
जो त्यांना घास चारी..

का रे जिव घेतला माणसा ..
का रे जिव घेतला..
माझ्या पिलांच्या उरात
भुकेचा जाळ तू चेतिला..

--बळीराम भोसले
Title: Re: घास....
Post by: asmita!! on April 23, 2012, 08:12:07 PM
kiti dukh ahe re tuzya kavitet. me ti purn wachuch shakat navhte. thodi tari bobddi walat hote mazya jibhechi.
Title: Re: घास....
Post by: jyoti salunkhe on April 25, 2012, 02:48:44 PM
hrudyasparshi kavita ....... :)
Title: Re: घास....
Post by: केदार मेहेंदळे on April 26, 2012, 11:05:53 AM
surekh....

jivo jivasy jivanam......
Title: Re: घास....
Post by: balrambhosle on May 22, 2012, 10:17:11 AM
dhanywad mitranno...tumach protsahan mala amkhi utsahit karat .........