आज मी सहज म्हणलं
एक पोळी वाया गेली तर
एवढं काय बिघडलं ?
पण माझ्या देशातील
हजार माणसे आज
माझ्याच मनातलं बोलली
त्यासोबत जगातील
करोड माणसे तेच म्हणाली
आणि, सोपं असं एक भयंकर
गणित मला समजलं
तुम्हाला समजलं का हो?
करोडो पोळ्या वाया गेल्या
लाखो माणसांच जेवण वाया गेलं
खरंच....
काय भयंकर समस्या आहे?
आज माझ्या देशात
कित्येकांना एक वेळेची
अनावर भूक भागवता येत नाही
आणि ....आणि मी
एक पोळी वाया घातली
उद्या कधी...जेव्हा मी
त्या भूकेलल्या लोकांत असेन
तेव्हा मला...तेव्हा मला
एका पोळीचं गणित कळून चुकेल
-आशापुत्र
khup chan vichar.
धन्यवाद केदारजी ... :)