(http://2.bp.blogspot.com/-FlpYIkdwQ3Y/T9blf6TTBvI/AAAAAAAAASM/R66u6P4kFjo/s1600/392380_417992898223661_818691060_n.jpg) (http://2.bp.blogspot.com/-FlpYIkdwQ3Y/T9blf6TTBvI/AAAAAAAAASM/R66u6P4kFjo/s1600/392380_417992898223661_818691060_n.jpg)
तेच ते दिवस जे सोबत आपण घालवले
आठवतात मला अन तुलाही आठवत असतील
बोलायचो आपण घरात कोपरा एक शोधून
मग चालू व्हायची चर्चा आपल्याच सर्व मित्रांची
खूप खूप मस्ती आपण फोनवरच करायचो
कधी टोमणे मारून डोळ्यांत पाणी
तर कधी हसत हसत निजवायचो ..!!
तेच ते दिवस आपली खूप महिन्याने भेट व्हायची
मग सारे भेटून कडकडून मिठी मारायचो
कुणी शब्दांनी तर कुणी अंगाने वार करायचो ..!!
तेच ते दिवस
आपले मन हलके करायला आपण
खूप खूप वेळ बोलायचो
आपणच जवळचे आहोत
म्हणून कधी जीवाशीही खेळायचो ..!!
तेच ते दिवस
सगळ्यांसाठी जीव तुटायचा सर्वात जवळचा तेव्हा तूच रे वाटायचा
तुझ्यासाठी मी खूप काही सोसायचो तरीही बोलताना मात्र हसूच हसू दाखवायचो ..!!
तेच ते दिवस
आपल्यात भांडण होते झाले एवढे दिवसाचे क्षण
त्यांना मनात कुठे गाडले
तरीही आठवतात अन डोळे भरून येतात
सांगताही येत नाही म्हणून
मनामध्येच घुसमळतात..!!
आज खूपच आठवतात ते सोबतीचे दिवस
माहित नाही ते पुन्हा भेटतील कि होईल एकट्यातच शेवट ....!!
चूकलो मी अन चुकली आहेस तू हि
पण मान्य करायची हिम्मतच दोघांस होत नाही ...!!
ये पुन्हा तू खरच सोबत हवी आहे
माझ्यासाठी तर तुज शिवाय येणारी पहाट नवी आहे ...
वाट बघतो रोज तू पुन्हा तशीच भेटशील
हरवलेले क्षण ते पुन्हा भेट तू देशील
तेच ते दिवस आता पाहिजे आहेत मला ...!!
-
(¯`v´¯)
.`·.¸.·´ ?
¸.·´¸.·´¨) ¸.·*¨)
(¸.·´ (¸.·´© प्रशांत शिंदे
tech divas parat yave ekda... :( apratim ,,,, :) :)