खूप काही मला लिहायचे आहे
जिवनाच्या कागदावरती शब्द उमठवायचे आहे.
कोठून सुरवात करावी अन कोठे जावून थांबावे
वाटे मला भूतकाळ कशाला वर्तमानच लिहावे.
इथे सुद्धा मी गोंधळून जातो
आठवलेले शब्द शाई विनाच लिहिण्यास लागतो.
लिहिताना जाणिव होते शब्द तर उमठतच नाही
वेडावलेल्या मनाला मग शब्द सुचतच नाही.
पाणावलेल्या डोळ्यातून अश्रूचा थेंब पाझरू लागतो
पुन्हा एकदा जिवनाचा कागद कोराच राहतो.......... ..!!!
Author- Unknown
Nice