हे जग एक भ्रम आहे
दिवस म्हणजे रात्र आहे
रात्र म्हणजे दिवस आहे
घुबडाचा दिवस तेंव्हा
माणसांची रात्र आहे
अर्ध्या पृथ्वीवर रात्र तेंव्हा
अर्ध्यावर दिवस आहे
सूर्य दिसत नाही म्हणून
रात्री सगळा अंधार आहे
सूर्य मात्र रात्री सुद्धा
आकाशातच तळपतो आहे
डोळे उघडले तर दिवस
मिटले तर रात्र आहे
सूर्याचेही अस्तित्व इथे
एका पापणीवर टिकून आहे
हे जग एक भ्रम आहे
मानलं तर मरण आहे
नाहीतर रात्रीची झोप आहे
काही जणांच्या नशिबी
जिवंतपणी मरण आहे
जिवंत असे तोवरी त्रास
मरण म्हणजे सुटका आहे
झोपून उठला तर जिवंत
नाही उठला तर मेलेला आहे
मरणात अन मरणा नंतरही
एक नवीन जीवन आहे
कधी डोळे उघडावे तर
रात्री नंतरचा दिवस आहे
कधी डोळे उघडावे तर
मरणा नंतरचा जन्म आहे
हे जग एक भ्रम आहे
मिनिटात सगळ खंर आहे
मिनिटात सगळ स्वप्न आहे
जे आहे ते मनातच आहे
बाहेर वेगळ काहीच नाहीये
दिसला तर सापाची भीती आहे
डोळे बंद कि सापच गायब आहे
दिसत नाही रात्री म्हणून
अंधाराची भीती आहे
पुढच्या क्षणाची शाश्वती
दिवसा उजेडीही नाहीये
जागेपणी दीसणार खरं
स्वप्नात सगळ खोटं आहे
कोणास ठाऊक जीवन म्हणजे
कदाचित एक स्वप्नच आहे
हे जग एक भ्रम आहे
जे आहे ते दिसत नाहीये
दिसतं तसं असत नाहीये
दूरवर दिसणारा तारा
केंव्हांच मेला आहे
आपल्या पर्यंत येणारा
जुनाच त्याचा प्रकाश आहे
जवळ जन्मलेला तारा
आजून दिसलाच नाहीये
आपल्या पर्यंत प्रकाश त्याचा
अजूनही पोहचलाच नाहीये
शरीर माझे, विचार माझे
आरशात एक प्रतिबिंब आहे
मी कोण? कसा दिसतो?
माझं मलाच माहित नाहीये
केदार...
धनुष्य मिळेल का? (गमन)
http://marathikavita.co.in/index.php/topic,8993.msg29545.html#msg29545 (http://marathikavita.co.in/index.php/topic,8993.msg29545.html#msg29545)
वैफल्यग्रस्त जीवनाचे बोल(गमन)
http://marathikavita.co.in/index.php/topic,8878.0.html (http://marathikavita.co.in/index.php/topic,8878.0.html)
दिसत नाही रात्री म्हणून
अंधाराची भीती आहे
पुढच्या क्षणाची शाश्वती
दिवसा उजेडीही नाहीये
जागेपणी दीसणार खरं
स्वप्नात सगळ खोटं आहे
कोणास ठाऊक जीवन म्हणजे
कदाचित एक स्वप्नच आहे
क्या बात है