Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Balgeet And Badbad Geete => Topic started by: shashaank on July 12, 2012, 10:17:05 AM

Title: गोड पावसाचे गाणे...
Post by: shashaank on July 12, 2012, 10:17:05 AM
गोड पावसाचे गाणे...

गडाड गुडुमसे ढगात होता
म्हातारी दळते दाणे
पावसात भिजताना गाऊ
ये रे ये रे चे गाणे

पाऊस पडता बेडुक गाती
डराँव डराँवचे गाणे
वा-यावरती नाचत येते
थेंबाथेंबांचे गाणे

थेंब टपोरे धावत येती
सरसरसर गाती गाणे
अंगणात मग फेर धरुनी
आम्हीही गातो गाणे

पावसात भिजताना गाऊ
गोड पावसाचे गाणे
हिरवी हिरवी होती शेते
कणसांचे गाती गाणे.......

-shashaank purandare.
Title: Re: गोड पावसाचे गाणे...
Post by: केदार मेहेंदळे on July 12, 2012, 10:38:59 AM
mast kavita... lahan zalya sark vatl.