ek]a k]aovaLyaa k]LIcaI Aapalyaa Aa[-laa ivaNavaNaI, ijacaa vaMSyaacyaa idvyaacyaa hvyaasaapaaozI Asta Jaalaa....
" मज अधिक रहाया नको तू आग्रह करू "
अधिक नाहीए मजकडे वेळ,
हा साराच आपुल्या नियतीचा खेळ.
आठवणी आज मोजदाद करता,
का बसत नाहीए स्वप्नांचा मेळ.
कठपुतलिच्या या खेळात,
उगीच नको तू भीड़ धरु.
काळ आणिक वेळेच्या या गट्टीला,
आवर मी कसा करू.....
तुटतील आपुली स्वप्ने,
या माणकांच्या तुकडयापरी.
अर्ध्यावरती संपणार डाव हा,
हेच शल्य माझ्या उरी.....
नयनासमोर स्मरते आज,
ती रुसलेली भातुकली .
अर्धशय्येवारती पहुडलेली ही,
तुझी फुलराणी तुझी छकुली.
हट्टाछे बोल आज,
नाही उमलणार या ओठी.
आज फ़क्त हावी आहे मला ,
आई तुझी वात्सल्याची मिठी.
हात जोडुनिया आज तु,
नको पाषाणाच्या विनवण्या करू.
मज अधिक रहाया नको तु आग्रह करू ,
कारण या जगतीची मी तर केवळ यात्रेकरू.
कविवर्य - विजय अरुण सूर्यवंशी.
( यांत्रिकी अभियंता )