Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Gambhir Kavita => Topic started by: विक्रांत on August 08, 2012, 06:46:01 PM

Title: अभिलाषा- जे .कृष्णमुर्ती कविता
Post by: विक्रांत on August 08, 2012, 06:46:01 PM
जे .कृष्णमुर्ती कविता -- मला उमगलेले कृष्णजी, हा कृष्णजीच्या तत्वज्ञानाचा मला झालेला बोध आहे .त्यावर टीका टिप्पणी नाही .ज्ञात अज्ञात मित्रांशी share करण्यासाठी हा प्रपंच


अभिलाषा हि
भविष्यातील आसक्ती असते
आणि प्रत्येक आसक्तीत
अंतर्भूत असतात
भीती मत्सर द्वेष चिंता
अन सर्व व्यापी पराधीनता
या पराधीनतेतून
जावे वाटते मुक्त होऊन म्हणून
सुखभोगाचा मानसन्मानाचा यशाचा
पाठलाग करते मन
अन जाते स्वत: पासून दूरवर पळून
पण जेव्हा जाते भूल उतरून
आणि वेदना घेते वेटाळून
तसेच मन पुन्हा
तडफडते होते उदासीन
या पळण्यातील निरर्थकता जाणून
कुणीतरी या आसक्तीतून
मुक्ती देईल  म्हणून
धावते मठ मठातून
मग त्याला मिळते मुक्तीचे आश्वासन
सोबत त्याच्या असतात पण
अटी,पाळायचे नियम, कडक व्रताचरण
याचे यथावकाश  फळ
"निरासक्ती " नक्की मिळेल
सांगीतले  जाते आवर्जून
पण या फळाची आसक्ती
कशी देऊ शकेल निरासक्ती......?
अभिलाषेपासून  मुक्ती.......?

विक्रांत प्रभाकर
Title: Re: अभिलाषा- जे .कृष्णमुर्ती कविता
Post by: केदार मेहेंदळे on August 09, 2012, 10:43:19 AM
far chan Shashank.... if you dont mind lahans correction
या पाळण्यातील निरर्थकता जाणून chya aivaji
या पळण्यातील निरर्थकता जाणून as hav aahe ka?

tasech
"निरासक्ती " नक्की मिळेन chya aivaji
[/size]
milel hav aahe ka

[/size]

Title: Re: अभिलाषा- जे .कृष्णमुर्ती कविता
Post by: विक्रांत on August 09, 2012, 01:35:50 PM
THANKS kEDAR CORRECTION DONE