*माझी कविता *
*फक्त तू .......*
कस सांगू राणी तुला
तुझ्या प्रती प्रीत माझी
तुझ्याविना कोठेतरी अडखळली
लपलेल्या ढगाआड सुर्याविना
सांज जशी मावळली
आठवणीच गार वार
थंडगार ते सार
मनी चुळबुळ चालवली
घड्याळान काट्याविना
टिक टिक टिक ऐकवली
तुझ्याविना जग जस
उजाडलेल रान तस
तुझ्याभेटी आस अशी आसुसली
पावसाने चातकाला
जशी पाठ दाखवली
कस सांगू राणी तुला
तुझ्या प्रती प्रीत माझी
तुझ्याविना कोठेतरी अडखळली
-अमोल बर्वे