डोळ्यांत भरले कुतूहल अपार
गोल गोबरे मऊ गाल
पसरून बोळके तोंडाचे
मनाला सुखावणारे
निरागस हास्य
बाळाचे
डोळ्यांतुनी वर्षती स्नेहधारा
स्पर्शात वाहे झरा मायेचा
चेहर्यावर ओसंड कौतुक
मनाला आश्वस्त करणारे
प्रेमळ हास्य
आईचे
डोळ्यांत लज्जा काठोकाठ
खळी गालावर मधाळ
ताणून भुवयांचे धनुष्य
मनाला वेड लावणारे
मोहक हास्य
प्रियेचे
डोळ्यांतुनी वाहती धारा
बत्तिशीचा बघा देखावा
लोळत गडबडा जमिनीवर
मनाला हलक करणारे
खळाळते हास्य
मित्रांचे
निरागस, प्रेमळ, मोहक, खळाळ
हास्याच्या या छटा विविध
सुखवूनी थकल्या जीवास
ठेवती जिवंत जगण्यास
केदार....
hasya chata kavitet umatlya aahet