(http://3.bp.blogspot.com/-8Obu93Uupv4/UEW_h03gwcI/AAAAAAAAAfw/mcR5oFikDJg/s1600/dulhan.jpg)
आज रात्र झिंगलेली
कधी उजाडणार, न ठरलेली
या रातीला ती सजलेली
अंग चोरून बसलेली
चंद्रप्रकाशात न्हालेली
रूपवान अप्सरा नटलेली
रंग सावळा, लाजलेली
हिरणी नजर झुकलेली
स्पर्श करता, शहारलेली
अन् गालातच हसलेली
अप्सरा मिलनास तरसलेली
मग अंतरे मिटलेली
ओठांनी ओठ टिपलेली
दुराव्यातून संगम मोहरलेली
बाहूंत बाहू लीपटलेली
अंगास अंग भिडलेली
हलकेच वेणी सोडलेली
वस्त्रे सैल झालेली
नितळ अंग, वेडावलेली
श्वासांनी गती घेतलेली
अन् प्रवाह झिरपलेली
रात्र प्रणयाची, दरवळलेली
आज रात्र झिंगलेली
-आशापुत्र
www.prashu-mypoems.blogspot.com
mast kavita.....
धन्यवाद केदारजी ... :)
SUNDAR
thanks tejas :)