निसर्गाकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे...त्याचंच एक उदाहरण म्हणून..
व्यक्ति आणि मंुगी
सतत वाट कापते मुंगी
आपल्याला असते विश्रांतीची गुंगी
प्रत्येक वाटसरुची भेट घेते मंुगी
एकलकोंडेपणाची माणसांस धुंदी
शिस्त मंुगीला सरळ रेषेची
आपल्याला वाहतुककोंडी नेहमीची
राणीला मान देते प्रत्येक मंुगी
लंपट नजरांनी घायाळ होते क्षणोक्षणी मुलगी
आयत्या बिळात नागोबाला
घर करुन देते मंुगी
भरल्या घराचा वाटा करून
सत्यनारायण घालतो आम्ही
दाणा दाणा गोळा करून
वारुळ भरत असते मंुगी
भरल्या गोदामांना आग लावून
आपण घडवून आणतो मंदी
एकजुटीने होते काम,
मंुगी त्याचे उदाहरण
एकमेकांचा पाय ओढण्याचं,
आपण करतो राजकारण
जगाचा नियम आहे,
शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ
अन् माझा असा कयास आहे,
व्यक्ति पेक्षा मंुगी श्रेष्ठ...