माणूस म्हणुनी मी आलो
या जमिनीवर जन्माला
नाही कधी पडू शकलो
कुणाच्याही उपयोगाला
बाळगुणी कपट स्वार्थ उरात
आयुष्याच्या वाटेवर चालत राहिलो
पाहुनिया सुख दुसऱ्याच्या दारात
उगाच मी मनात जळत राहिलो
झटत राहिलो आयुष्यभर
पैसा पैसा करुनी
करी एकाकी प्रवास जीवनाच्या वाटेवर
नाती गोती सोडूनी
जाता जाता डोळे उघडूनी
आता सारे दिसून आले
मोह मायाच्या जाळ्यात अडकुनी
साऱ्यांनाच खूप दूर सारले
रहावया लहानग्या शरीरास
बांधत राहिलो ताजमहाल जन्मभर
पडली होती विसर मनास
मिळती स्मशानात जागा वितभर
नाही आता कुणी उरले
माझ्या अंतिम यात्रेला
कावळे देखील नाही आले
शिवावया माझ्या पिंडाला
समीर सु निकम