मला शास्रीजी हवे .
डोकंच काम करत नाही हे चाललंय तरी काय ?
हा भारत स्वतंत्र आहे कि पारतंत्र्यात हाय ?
कुठे गेली ती माणसं जी पारतंत्र्यात होती
मायभूमिसाठी ज्यांनी जीवाची बाजी लावली होती
टिळक , सावरकर , आगरकर ,यांची हि भूमी होती
फक्त देशासाठी त्यांनी स्वतःचीही राख केली होती
अहिंसेच्या मार्गान चालणारा तो गांधीही इथलाच होता
भगतसिंग , सुखदेव ,राजगुरू यांनीही देशासाठीच फास आवळला होता
राणी लक्ष्मिबाईनही इंग्रजांना धूळ चारली होती
सावित्री , रमाबाई , या समाजधुरीनींनी ही भूमी पावन झाली होती
तो शिवाजी न नरवीर चिमाजी या मातीतलाच होता
ज्यांनी मुगल अन इंग्रजांना पळता भुई केला होता
फुले , आंबेडकर , हे समाजसुधारक या मातीतच जन्मले होते
भारत मातेनेही केले वंदन इतके त्यांचे कार्य महान होते
" जय जवान जय किसान " हि हाक शास्रीजीनी दिली
सुभाश्चन्द्रांनीही स्वातंत्र्यासाठी "आझाद हिंद सेना" स्थापली
किती किती अनमोल हिरे या भूमीने पाहिले
ज्यांनी या मातेसाठी आपले रक्तही सांडले
पण आज हा सारा इतिहास लोकांच्या विस्मरणात गेला आहे
चांगल्या पुत्रांसाठी ही भूमी आजही तरसत आहे
कोटींच्या कोटी उड्डाणे पुढारी आज घेत आहे
हावंरटासारखे लचके तोडून या भूमीस ओरबाडत आहे
कुठलाही नेता आज समाजास आदर्श राहिला नाही
साधा नगरसेवकही कोटींच्या घरात गेल्याशिवाय राहिला नाही
इतके भ्रष्ट नेते निपजतील जर त्यांना ठाऊक असते
तर स्वातंत्रासाठी त्यांनीही आपले रक्त सांडले नसते
रोज बाहेर पडताहेत
भ्रष्टाचाराचे घोटाळे नवे नवे
पंतप्रधान असूनही गरीबच राहिले
ते लाल बहादूर शास्रीजी आज मज हवे
आज त्यांचे आत्मेही
अश्रू गाळत असतील
चांगले पुत्र पाठव या माय भूमीवर
देवाला साकडे घालत असतील .
संजय एम निकुंभ , वसई
दि. १८.१०.१२ वेळ : १०.००वा . { बँकेत }
chan kavita...