तुला पाहता
शब्द हवेत विरून जावे
असं का ग व्हावे
मी माझे न राहावे
तू चालता
वाऱ्याची झुळूक जणू यावी
मी ही त्याच संगे
का दरवळत जावे
स्पर्श तुझा
जणू मोरपिसाचा भास हा
अन तू समोर येता
का भरून जातो श्वास हा
एकाच इच्छा,
तुला कोणाचीही कधी नजर ना लागे
जर तुटला कधी श्वास तुझा..
तर जोडीन मी माझा श्वास
तुझा श्वासामागे..
-किरण पवार
http://kiranpawar0108.wordpress.com
kavita chan aahe pan prem kavitet asayala havi hoti.... virah kavitet ka post keli aahe?
thank u.. actually te laksht ale nahi.. mi move krto prem kavita madhe