II रंगपंचमी II-लेख क्रमांक-6

Started by Atul Kaviraje, March 18, 2022, 07:56:38 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                          II रंगपंचमी II
                                          लेख क्रमांक-6
                                        ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०३.२०२२, शुक्रवार, रंगपंचमीचा रंगीत दिवस आहे. "फाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा हिंदूंचा एक उत्सव. होळी मागोमाग येणारा आणि सर्वांना हवा हवासा वाटणारा दुसरा सण म्हणजे 'रंगपंचमी'. 'रंगपंचमी' हा सण येतो फाल्गुन कृष्णपंचमीला, ह्या दिवशी सर्व लोक रंग खेळतात. एकमेकांच्या अंगावर रंग टाकतात." मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहिणी, कवी-कवयित्रींनी रंगपंचमीच्या हार्दिक रंगीत शुभेच्छा. चला, तर वाचूया, या रंग-सणावर लेख,माहिती, निबंध, शुभेच्छा, शुभेच्छा संदेश,शायरी आणि बराच काही--

       रंगपंचमी सणाचे महत्व Importance of Rangpanchami :---

     रंगपंचमी हा वसंत ऋतू जे संबंधित एक महत्त्वाचा सण आहे. परंपरेने चालत आलेल्या हिंदू धर्माचा महत्त्वाचा सण म्हणून सुद्धा या सणांना ओळखतात. सर्व राग ,द्वेष विसरून ना रंगपंचमीच्या शुभेच्छा देतो मैत्रिपूर्ण बाबाच्या संबंधाने रंग लावून रंगपंचमी सण साजरा करतात.

     उन्हाळा ऋतु च्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो. उन्हाळाच्या कडक होणारे अंगाची दाह होत असल्याने एकमेकांच्या अंगावर पाणी टाकत आणि रंग लागत  थंडावा निर्माण करण्याची रीत आहे.

     धार्मिक पद्धतीनुसार सुद्धा या सणाला महत्त्वाचे स्थान आहे. काही भागात वसंत पंचमीच्या दिवशी बलराम मंदिरात या सणाची सुरुवात होते.

     या दिवशी होळी सणाचे संबंधित गीते गायली जातात.  वज्र प्रांतात कृष्ण आणि बलराम होळीच्या सणाचा आनंद घेत असतात असे मानले जाते.

     उत्तर प्रदेशात होळी सणाचा आनंद घेण्यास  धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते.

     रंगपंचमीच्या या सणातून आपल्याला एक शिकवण मिळते, जात पात धर्म भेद सर्व विसरून आनंदाने एकमेकांना सुखी जीवनासाठी रंग लावून रंगपंचमी सणाच्या शुभेच्छा दिल्या जातात.

     तसेच या रंगपंचमी हा उत्सव साजरा करताना नैसर्गिक रित्या रंग वापरून नाव सांग साजरा करणे महत्वाचे आहे.

     विविध रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्या, मेहंदी, गुलमोहर पाणी, बीट, हळद, टोमॅटो, पीठ इत्यादी पदार्थ वापरून रंग तयार करण्याची प्रथा आहे.

रंगपंचमी सण कसा साजरा करतात How Rangpanchami is celebrated :--

     रंगपंचमी या सणाची  प्रथा कृष्ण काळापासून चालत आलेली आहे. बालकृष्ण लहानपणी त्यांच्या बालगोपाळांना सोबत रंगपंचमीचा  सन साजरा करत असल्याचे आढळते.

     आजही विविध प्रांतात आनंदाने आणि उत्साहाने रंगपंचमीचा सण साजरा केला जातो.  मध्ययुगात स्थानिक होळी आणि रंगपंचमी हा सण साजरा करत होते.

     होळी, रंगपंचमी आणि धुलीवंदन या तिघांना मिळून नववीचा मुख्य सण साजरा केला जातो.

     वास्तविक फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी असते, होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन असते आणि त्यानंतर रंग उडवण्याचा म्हणजे रंगपंचमीचा सण असतो.

     रंगपंचमीच्या दिवशी सर्वजण  पांढऱ्या रंगाचे कपडे घालून विविध रंगाने रंगपंचमी खेळतात.

     काही ठिकाणी मोठ्या कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन केले जाते. सर्व धर्म ,जात, पंथ विसरुन हा सण साजरा केला जातो. सर्वांच्या आयुष्यातील दुःख नष्ट होऊन सुखाचे रंग उतरावे अशी प्रार्थना केली जाते.

     रंगपंचमी या सणा दिवशी भांग पिण्याची प्रथा आहे. म्हणजे एक नसीला पदार्थ आहे.  भांगसी दुधात टाकून आपली जाते ज्यामुळे गुंगी येते.

     भांग पिण्याची प्रथा ही पुरातन काळापासून चालत आलेली आहे. रंगपंचमीच्या या दिवशी सर्वजण भाग पितात आणि रंगपंचमी सणांचा आनंद घेतात.


--AUTHOR UNKNOWN
-------------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इन्फॉरमेशन एसे.कॉम)
                  ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.03.2022-शुक्रवार.