आनंदी नाताळ-ख्रिसमस-कविता-2

Started by Atul Kaviraje, December 25, 2022, 12:00:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 आनंदी "नाताळ-ख्रिसमस"
                                ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज २५.१२.२०२२, रविवार, नाताळचा पावन दिवस आहे. जोसेफ आणि मेरी यांचा सुपुत्र, देवाचा प्रेषित प्रभू येशू याचा जन्म दिवस. मराठी कवितेच्या माझ्या सर्व ख्रिस्ती भाऊ-बहिणींना, "नाताळ-ख्रिसमस" -च्या हार्दिक शुभेच्छा. चला तर ऐकुया नाताळाच्या काही आनंदी कविता-

                               "आणि नाताळ बाबा हसला!!"
                              ---------------------------

या विचाराने नाताळ बाबाने फिरवले
आपल्या गाडीचे चक्कर.
दृश्य सारे पाहुनी डोके त्याचे फिरु लागले गरगर.

नाही उरली इथे माणुसकी नाही कुणाला आपुलकी,
माणुसच माणसाच्या जिवावर उठला
सारे पाहून नाताळ बाबा हसला !!

जिथे आहे पैशांची खणखण
तिथे माणुसकी ची चणचण

ओसंडलेले वाया जाण्याआधी
इतरांना देण्याची कधी येईल बुद्धी
विचार करून नाताळ बाबा हसला !!

कुणी गरीब हात पसरती
हात तयाचा उडवून लावती

मी पणाचा बाजार येथे थाटला
सारे पाहून नाताळ बाबा हसला !!

काय कामाची श्रिमंती पैशाची
कधीतरी दाखवावी श्रीमंती मनाची

चांगुलपणाचा प्रत्येकाने फक्त बुरखा घातला
विचाराने नाताळ बाबा हसला !!

माणुसकी जपण्याचा जरा ऐका माझा सल्ला
बोलुन मग नाताळ बाबा हसला !!

हाती असलेल्या भाकरीतुन अर्धी द्यावी गरीबाला
असेल तुमच्या कडे मणभर कणभर द्यावे गरजुला

जे आहे तुमच्या कडे भरपूर
तेवढेही नसेल कदाचित कुणाकडे
शोधुनी त्याला धावुन जावे मदतीला

प्रत्येकाला मिळावा त्याच्या वाट्याचा
आनंद आणि हर्ष
तोच खरा नाताळ तेच खरे नववर्ष

माणुसकी जपण्याचे मोठे गिफ्ट देऊन गेला
जाता जाता नाताळ बाबा हसला !!!

--दीपमाला अहिरे
----------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
                     ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.12.2022-रविवार.