आशा-निराशा-गीत (SAD SONG)-जीवनात निराशाच पदरी आल्यात, जणू आशा कुठेतरी हरवल्यात !

Started by Atul Kaviraje, January 31, 2023, 12:53:44 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, आशा-निराशा कविता-गीत (SAD SONG) ऐकवितो. " बड़ी सूनी सूनी है, ज़िन्दगी ये ज़िन्दगी"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही मंगळवार-दुपार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे -(बड़ी सूनी सूनी है, ज़िन्दगी ये ज़िन्दगी)
--------------------------------------------------

            "जीवनात निराशाच पदरी आल्यात, जणू आशा कुठेतरी हरवल्यात !"
           -----------------------------------------------------------

जीवनात निराशाच पदरी आल्यात,
जणू आशा कुठेतरी हरवल्यात !

जीवनात निराशाच पदरी आल्यात,
जणू आशा कुठेतरी हरवल्यात !
आजही आशेच्या मी आहे शोधात,
तरीही पडतोय निराशेच्या खोल डोहात !

सुनी सुनी आहे या जीवनाची डगर
उदासच आहे हा जीवन सफर
पावलांना आता नाहीय ओढ कशाची,
भयाण अंधाऱ्या या निबिड अरण्याची.

मी स्वतः इथे हरवून गेलोय
मी माझं मीपण हरपून बसलोय
मी स्वतः इथे अजनबी आहे,
मी स्वतःलाच इथे अजनबी आहे.

या मनात कधी उत्साह भरेल ?
या मनात कधी उमंग येईल ?
क्षणासाठी का होईना दुःख कमी होईल ?
ही खोटी आशा तर नसेल ?

हळुवार पावलांनी येईल दुःख
मला हलकेच गोंजारेल दुःख
स्मितहास्य करीत विचारील दुःख,
माझी चौकशी करील दुःख.

असं कधीतरी घडलं तर
सुखाने मला विचारलं तर
दुःख कायमचेच दूर जाऊन,
सुखाने दिलजमाई केली तर.

आज झोप कोसो दूर आहे
जणू ती कुणी हिरावून नेली आहे
सुखाची निज मी कधी घेईन ?
सुख-स्वप्नांत मी कधी रमेन ?

जणू सुख कुठेतरी हरवलय माझं
त्यालाच मी शोधीत आहे
कि मीच ठेवून कुठेतरी त्याला,
उगाच हुडकत बसलो आहे.

मित्रांनो आशा नाही, सर्व निराशा आहे
दोन्हींच्या काठावर मन दोलायमान आहे
सुख नाही, तर फक्त दुःखच आहे,
बेबस असहाय्य मन माझं सांगत आहे.

जीवनात निराशाच पदरी आल्यात,
जणू आशा कुठेतरी हरवल्यात !

जीवनात निराशाच पदरी आल्यात,
जणू आशा कुठेतरी हरवल्यात !
आजही आशेच्या मी आहे शोधात
तरीही पडतोय निराशेच्या खोल डोहात !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.01.2023-मंगळवार.
=========================================