कंदिल

Started by शिवाजी सांगळे, December 04, 2016, 12:11:33 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

कंदिल

लाईट नसलेल्या गावात...
गुरं परतीच्या सांजेला
नाजुक कापर्‍या हाताने
फुई आजी राखेने
लख्ख काच पुसायची
कंदिल प्रकाशात पार
उजळून जायची पडवी
गुरांच्या स्वासांचा...,
घंटाचा नाद घुमु लागे...
तोवर कुणी घोंगडी अंथरे,
मधोमध कंदिल
आजीेच्या पुढ्यात हरीपाठ
कोंडाळ करून आम्ही मुलं,
"देवाचीये द्वारी..." पासुन
"आरती ज्ञानराजा..." पर्यंत
गोड समाधी, भारणारी
शेवट... साखर शेंगदाण्याचा
मिठाई पेक्षा, गोड प्रसाद
आता विज आली अन्
हरीपाठ... हरवला...
आजी संगे...हरवला,
कंदिल आठवणीतला!

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

कुमार संजय

 खुप छान सर ... कविता अप्रतिम झाली आणि विषय पण प्रत्येकाच्या जीवनातला अंधार दुर सारणारा ..कंदिल

शिवाजी सांगळे

संजय कुमारजी, इतक्या उशीरा पर्यत जागुन आपण प्रेरणायी प्रतिक्रीया दिल्या बद्ल खुप धन्यवाद. शुभ रात्री
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९