काळजावर कांदा चिरला . . .

Started by Deepak Pardhe, April 08, 2012, 12:33:16 AM

Previous topic - Next topic

Deepak Pardhe

( मित्रांनो, जसे आपण प्रत्येकजन  आपल्या आईला आणि वडीलाना थोर मानतो तसे प्रत्येकाचेच नशीब असते असे नाही, त्यामुळे माझी ही कविता माझ्या त्या मित्रांसाठी ज्यानी वयाच्या अगोदर घराची जबाबदारी सांभालळी पण शेवटी त्यांच्या हातात काहीच नाही उरले.... माझे विचार सर्वानाच पटतील असे नाही पण मी त्यात काही भावना मांडण्याचा प्रयत्न केला आहे, तो फ़क्त समजुन घ्याल अशी आशा बाळगतो . . .)


कवितेचे नाव :     काळजावर कांदा चिरला . . .     

उगिवाला दिस कसा घामातं भिजला,
काळजावर कांदा माह्या बापानं चिरला . . .

राब राब राबुन कामातं, मोठं आईनं केलं,
रातीचा दिस अन् दिसाची रात, समदं तिनं सोसलं,
काय पांग फिटलं नशिबाचं, जनम असा म्या घेतला,
काळजावर कांदा माह्या बापानं चिरला . . .

झालो मोठा तवा जवळ काय बी नव्हतं,
सपानं डोळ्यामंदी मोठं, अन् जिव माझं जळतं,
मारून वाघा सारखी उडी, घास हत्तीचा घेतला,
काळजावर कांदा माह्या बापानं चिरला . . .

जबाबदारी पार पाडीत, संसार बहीणींचा वसिवला,
बापाच्या डोक्याचा भार, ऐेसा म्या कम केला,
पण कदर न्हाय ठेवली त्यानं माझी, घात ऐसा हा केला,
काळजावर कांदा माह्या बापानं चिरला . . .

पण आता थांबायचं न्हाय गड्या, जैसा जनम नवा घेतला,
रहायचं उभं परत, जरी कणा माह्या मोडला,
आशीर्वाद राहुदी देवा तुझ्या माह्यावर, खेळ जरी नशिबानं मांडला,
फिकर न्हाय मला त्या बापाची, ज्यानं माह्या काळजावर कांदा चिरला . . .


- दीपक पारधे

prasad26

Chan vatali vachayala. hi airani bhasha ahe ka?
काळजावर कांदा माह्या बापानं चिरला . .
I could guess the meaning but would like to know --ha shabda prayog pahilach astitvat hota ki it is introduced by you?

Deepak Pardhe


Actually... i can not give guarantee... cause Mi Shahrat rahato aani Majhya gavi hya type chi bhasha bolali jaate...

tyamule mi confirm ti bhasha use keli aahe he kahi sangu shakat nahi... mala ashi bhasha bolata yete... pan ti nakki kuthali aahe he sangane kathin aahe....

jyoti salunkhe

 I must say Deepak............. :) tuzhi marathi fantastic  ....... :) etaka kaskay suchtere tula......... :) kavita khup bhari aahe  :)

Deepak Pardhe


Thanks Jyoti... for appreciation... this is nothing but just feelings.... mi jevha Kavita lihato tevha prayatna karto swatala ti situation samor thevun

majhi swatachi Bhavana Mandnyacha....

ek goshta mothi... kharach mala far anand hoto.. ki tumhala majhya kavita avadtat...