जन्मोजन्मीचा बंध आपसूक कळतो

Started by Tushar Kher, November 24, 2012, 10:43:19 AM

Previous topic - Next topic

Tushar Kher

शंभर माणसं असतात आसपास
का एकच चेहरा आपलासा वाटतो ?
का तो दिसता,चेहरा आपला खुलतो ?

संगतीला कुण्णीही चालतं
का एकाजवळंच मोकळं होतो ?
का भरुन येता त्याच्याच कुशीत शिरतो ?

अनेक दुखापती पाहतो सहज
का एकाच्याच दुखण्याने जीव कळवळतो ?
का त्याच्यावरचे वार स्वत:वर झेलतो ?

सरळ शब्दं हमखास कोडं घालतात
का एकाचंच मौनही धडाधड वाचतो ?
का त्याच्या एका शब्दासाठी श्वास अडकतो ?

आठवणींचे वादळ वेडावत येते
का एकाच्याच आठवणीत मनसोक्त भिजतो ?
का भर उन्हात त्याच्यावर छाया धरतो ?

जुने नवे स्पर्श तर होतात वरवर
का एकाचाच सहवास मनाला गुदगुल्या करतो ?
का त्याच्या मिठीसाठी आजन्म आसुसतो ?

कळायला वेळ थोडा जरुर जातो
पण , जेव्हा तर्क वितर्कांच्या पल्याड पोहचतो
जन्मोजन्मीचा बंध आपसूक कळतो..

जन्मोजन्मीचा बंध आपसूक कळतो

केदार मेहेंदळे