रात्र

Started by hdshewale, November 27, 2012, 06:13:39 PM

Previous topic - Next topic

hdshewale

चंदेरी रात्र अणि मंद पुष्प सुहास...
उलगडेच ना हा अनुभव कि भास...
या निसर्ग कौशल्यात न्हाहुन मी निघाले,
काळोखातील  हे सौंदर्य डोळ्यात साठून मी घेतले...
ते फुल-वेलींचे डोलणे,
त्यांना वार्याची साथ..
जणूकाही नर्युत्यांगाना अवतरल्या या अवकाशात...
हे चांदणं नव्या नवरी सारखं सजलंय...
चंद्राच्या या स्वयंवरास संपूर्ण अवकाश अवतरलंय...
थकलेले पंख घरट्यात जाऊन निजले..
उद्याची नवीन स्वप्न याच रात्री रंगविले ...
निजलेले जग अवतीभवती , मी मात्र रमले होते ..
या रात्रीने माझे मन केव्हाच जिंकले होते ..
आकाशाची सैर करताना रात्र  हि संपली ,
जणुकाही माहेरवाशीण चांदणी सासरी निघाली ...

Kiran Patil