गझल

Started by सूर्य, November 28, 2012, 09:05:44 PM

Previous topic - Next topic

सूर्य

हिंडतो आहे कधीचा मी तुझ्या रक्तात आता ..!
काय शामिल होत नाही मी तुझ्या शब्दात आता ...!


पाहतो स्वप्नात मीही योजिलेले घर तुझे ते ,
पण तुझा मुक्काम आहे कोणत्या शहरात आता ?


जर तुला कळले कधी तर आस~याला येत जा ,पण
पापणीला पापणी भेटत नसे दिनरात आता ..!


त्याच त्या शून्याकडे बघता मला आवाज येतो ,
हा कुठे शेवट अता अन ही कशी सुरवात आता ?


कोणतेही काम माझे मी तुझ्या करतो हवाली  ,
एक मस्ती सारखी दिसते तुझ्या डोळ्यात आता ..!


(पंख फैला तू खुशीसे) कोण हे म्हणते मला रे?   
पाखराला वाटते तू झेप घे गगनात आता ..!


काळ मागे लागल्यावर भासतो आभास नुसता ,
पण मला का कळत नाही मीच काळोखात आता..!


बंद खोल्यांना घडावा वाद एकांतातला मग ,
सारखा येईन म्हणतो मी तुझ्या ओठात आता ..!


त्या घडीला मैफिलीची सांगता होणार होती  ,
पण मला संधी दिली बोलायची कोड्यात आता ..!


सारखी मज झिग चढते अन गझल सुचते नव्याने  ,
एक सागर बुडुन जातो आपल्या कैफात आता ..!




संदीप पाटील (सूर्य)..

rudra

पाहतो स्वप्नात मीही योजिलेले घर तुझे ते ,
पण तुझा मुक्काम आहे कोणत्या शहरात आता ?
:( :( :(

केदार मेहेंदळे


Dr. Razzak

Mast! Chhan! Kya bat hai!

Mandar Bapat


विक्रांत


Madhura Kulkarni

भासात तू श्वासात तू,
तू जखमी हृदयात माझ्या.....
छायेत तुझ्या आठवणींच्या
रमून जातो जीव आता....
:)