जीवनाचा प्रवास....

Started by Ankush S. Navghare, Palghar, December 02, 2012, 11:37:38 AM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

जीवनाचा प्रवास कुठून चालू होतो
कुठे जाऊन संपतो कसलाच थांग लागत नसतो
आपल्याला फक्त ज्या वाटेने जायचे आहे
तीच वाट दिसत असते
खुप वळणे येतात झाडे झुडपे येतात
तरीही न थांबता कधी
फुलांतून तर कधी काट्यांतून चालायचे असते
प्रवासात खुप माणसे भेटतात
कोणी अनोळखी तर कोणी
मित्र बनतात
असेच चालता चालता असे वाटते
Thank God आता प्रवास संपत आला आहे
आणि मग अचानक मोठे वळण येऊन समजते

आता तर प्रवास कुठे सुरु झाला आहे
आता तर प्रवास कुठे सुरु झाला आहे.....

.... अंकुश सू. नवघरे.
.... Ankush S. Navghare.

केदार मेहेंदळे


Ankush S. Navghare, Palghar