पण कवी मात्र बनायचेच आहे....

Started by Ankush S. Navghare, Palghar, December 03, 2012, 09:57:24 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

आताच तर लिहिण्यास सुरुवात केलीय
अजून खुप काही लिहायचे आहे
एका वहीचे काय घेऊन बसलात
पूर्ण आयुष्यच त्यात घालवायचे आहे...

कधी झाडांवर तर कधी हिरव्या
वेलींवर झुलायचे आहे
कधी नदीच्या तर कधी सागराच्या
अंतरंगात शिरायचे आहे....

कधी जमिनीवर तर कधी आकाशात
उंचच उंच उडायचे आहे
कधी घारीसारखे वेगाने
तर कधी फुलपाखरासारखे
फुलांभोवती भिरभिरायचे आहे....

कधी डोंगरावर तर कधी
दऱ्याखोऱ्यानमध्ये शोधाशोध करत फिरायचे आहे
कधी क्षितिजावरती चढत चढत
सूर्या सारखे चमकायचे आहे....

कधी फुलांसारखे सुगंध देत
दरवळत राहायचे आहे
तर कधी देवाच्या चरणावर
निर्माल्य बनून राहायचे आहे....

कधी दुसऱ्याला सुखी करून
स्वतः मात्र झुरायचे आहे
कधी स्वतःसाठी तर कधी
दुसऱ्याच्या भल्यासाठी जगायचे आहे....

हे सर्व लिहिता लिहिता
एक भान नेहमी ठेवायचे आहे
की माणुसकीला काळिमा न लावता
आयुष्यात भरून पावायचे आहे....
आयुष्यात भरून पावायचे आहे....

.... प्राजुन्कुश
.... Prajunkush.

केदार मेहेंदळे


Ankush S. Navghare, Palghar