काही झाले तरी जगणे सोडायचे नसते....

Started by Ankush S. Navghare, Palghar, December 04, 2012, 10:16:46 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

ती जन्माला आली आणि
लगेच तिची आई तिला सोडून गेली...
तिचा काही दोष नसताना
लोकांनी तिचीच विटंबना केली...
पांढऱ्या पायाची पांढऱ्या पायाची
असे लोकांनी बोलणे सोडले नाही
काही असो तिने जगणे सोडले नाही....!!१!!

बापाने दुसरे लग्न केले
आणि घरात सावत्र आई आली
प्रेम मिळायचे राहीले दूर
आणि कुचंबणाच नशिबी आली
सारा त्रास सहन करूनही कधी
एक शब्दही उलट बोलली नाही 
काही असो तिने जगणे सोडले नाही....!!२!!

शिकवायला कुणी नव्हते तरी
अभ्यास करतच राहिली
मोठे होण्याची स्वप्ने
नेहमी पाहातच राहिली
घरचे काम नोकरी करूनही
रात्रपाळीची शाळा कधीही बुडवली नाही
काही असो तिने जगणे सोडले नाही....!!३!!

वीस वर्षांची झाली तेव्हा बापही गेला
वयात आलेल्या मुलीचा मोठा आधार हरवला
वंशाचा दिवा नसूनही सारा भार
हिच्याच खांद्यावर आला
तरी कष्ट करायला ती कधी घाबरली नाही
काही असो तिने जगणे सोडले नाही...!!४!!

पाहता पाहता मोठी झाली
स्वतःच्या पायांवर उभी राहिली
तरीही आपले आधीचे संस्कार
कधीही विसरली नाही
काही असो तिने जगणे सोडले नाही...!!५!!

अचानक तिच्या जीवनात
कोणी जोडीदार बनून आले
तिच्याशीच लग्न करायचे
असे त्याने ठरविले
पाहता पाहता त्यांचे लग्नही झाले
लग्नानंतरही तिने घरच्यांशी नाते कधी तोडले नाही
काही असो तिने जगणे सोडले नाही...!!६!!

जीवन हे खुप दुर्मिळ असते
कोणाचे चांगले तर कोणाचे खडतर असते
पण तरीही मागे हटायचे नसते
ह्या मुलीसारखे सतत झाटायचे असते

कष्टाचे फळ कधी न कधी मिळतेच
लावलेले प्रत्येक रोपटे कधीतरी फुलतेच
जरी मिळणे हे नियतीच्या हाती असले
तरीही करणे मात्र आपल्याच हाती असते

म्हणूनच कितीही संकटे आली तरी रडायचे नसते
काही झाले तरी जगणे सोडायचे नसते....
काही झाले तरी जगणे सोडायचे नसते....
.... प्राजुन्कुश
.... Prajunkush.

केदार मेहेंदळे



Ankush S. Navghare, Palghar



Ankush S. Navghare, Palghar