मनात आले एक कविता करावी...

Started by Ankush S. Navghare, Palghar, December 05, 2012, 01:19:08 AM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

मनात आले एक कविता करावी...
साधी सरळ सोपी
कोणालाही समजेल अशी एक कविता करावी...

झाडावर किव्वा मातीवर करावी
फुलावर किवा फुलपाखरावर करावी
पानावरच्या दवावर किव्वा
त्याच्या सोनेरी किरणांवर करावी
मनात आले एक कविता करावी...!!१!!

कवितेत नको कोणी राजा आणि राणी
फक्त असावी मनाला भावतील अशी
गोड गोड गाणी
कोणीही आपलेपणाने सतत गुणगुणावी
मनात आले एक कविता करावी...!!२!!

कवितेत नसावे कोणी प्रियकर किवा प्रेयसी
त्यांच्या प्रेमाचे दु:ख किवा प्रेमाची रडगाणी
पण कोणीही प्रेमात पडावी अशी कहाणी असावी
कोणाच्याही मनात पटकन भरून
हृदयात खोल शिरावी
मनात आले एक कविता करावी...!!३!!

कवितेला असावा एक आपलेपणा
कधीही न संपणारा मायेचा ओलावा
कवितेत असावा प्राजक्ताचा सहवास
सुंदर उमलणाऱ्या रातराणीचा सुगंधी वास
प्राजक्ता असो की रातराणी
पटकन ओंजळीत धरून ठेवावी
मनात आले एक कविता करावी...!!४!!

कवितेत असावे पशु पक्षी झाडे वेली
आंब्याच्या झाडाला चंदनाच्या साली
सर्वकाही स्वप्नवत असले तरीही
वास्तवातील जीवनात तंतोतंत उतरावी
मनात आले एक कविता करावी...!!५!!

कवितेला असावे तिचेच मन
स्वच्छ निर्मळ मोत्यासारखे सुंदर
अबोल तरीही हिऱ्यासारखे अनमोल
कवितेला असावे तिचेच नाजुक हृदय
सतत मला बोलावणारे माझ्यासाठी धडधडणारे
कविताच नाहीतर ती माझी प्रेयसीही बनावी
मनात आले एक कविता करावी...!!६!!

जगात कितीतरी लोक कविता करतात
काही कविता स्मरतात तर काही
भूतकाळात विरतात
माझी कविता मात्र अनमोल ठरावी
आयुष्यभर पुरून उरावी
मनात आले एक कविता करावी...
मनात आले एक कविता करावी...!!७!!

.... प्राजुन्कुश
.... Prajunkush.



केदार मेहेंदळे


Ankush S. Navghare, Palghar