ते हॉस्पिटल मधले दिवस

Started by amoul, December 16, 2012, 12:35:28 AM

Previous topic - Next topic

amoul

असे विचित्र फासे पडती काळगतीला,
पाळण्यात पक्षीण पिल्लू जोजवी आईला.

त्या नियतीचक्रानी असाही डाव केला,
आधार केला लुळा, भार दिला बापला.

कर्म योगानेही  त्यांची निरखून पहिली निष्ठा,
बाप उताणा होता लेक काढी  विष्ठा.

चिंतेत रात्र अख्खी  विचार गोंधळ जागराला,
पोर बापासमोर आवरून पापण्यात सागराला.

अथांग काळजीचा डोंब उसळे काळजात,
सौभाग्याचा मिनमिन्ता दिवा लोळता अंथरुणात.

डोळ्यास नाही डोळा व्यथेत तुलसीची मालकीण,
घरी कालवा मायेसाठी निपचित पडली अर्धांगिन.

काळ गतीच्या घाल्यावरती माणुसकीची पडते फुंकर,
राबत असतो ईश्वरी सेवेसाठी हात  निरंतर.

भावनांचे  रूप आसवे तरीही त्यांना रंग नाही,
आशेची ओठांवर कोर काळजात लाही लाही.

अमोल

केदार मेहेंदळे


santoshi.world

ह्म्म्म्म .....घरातली कोणी एक व्यक्ती आजारी पडली कि पूर्ण घरच आजारी पडतं  :(