काजल रातीनं ओढून नेला-हा खेळ सावल्यांचा (१९७६)

Started by swara, December 21, 2012, 10:08:10 AM

Previous topic - Next topic

swara

काजल रातीनं ओढून नेला सये साजन माझा
जीव ये भरुनी भिजते पापनी कधि रे येशिल राजा || ध्रु ||

पाऊस येडापिसा जिवाला लावून गेला तात
तुफान आलं सुसाट माजा करून गेला घात
कातरयेळी करनी जाली हरवून गेला राजा || १ ||

सुकली फुलांची शेज राया राहिला अर्धा डाव
उधळून जाता खेळावाया श्वासांनी तोडिला ठाव
भुकेली ज्वानी जळते आतुनी ये रे ये एकदा राजाे || २ ||