तू ऑफिस मध्ये नसतांना

Started by amoul, December 23, 2012, 11:37:02 PM

Previous topic - Next topic

amoul

वारा असून नसल्यासारखा होता का कुणास ठाऊक,
चेहरा हसून रुसल्यासारखा होता का कुणास ठाऊक.

वारयावर झालाच नाही पावलांचा हळुवार आवाज,
दिवसानेही अमावसेच्या रात्रीचा लाऊन घेतला रिवाज.

सांज  रागावली होती कारण हुरहूर चोरली दुपारने,
सांज निमूट सुन्न कठीण मोकळ्या क्षणांस सारणे,

आज गंध उतरलाच नाही दररोजपरी जमिनीवरी,
श्वास नुसताच चढला उतरला वाटलाच नाही श्वासापरी.

कंटाळून तू  झिडकारते नको असलेली गोस्ट एखादी,
कंटाळ्यालाही गम्मत यावी तू लडिवाळपणे झिडकारल्याची.

आज शब्द ऐकून कुणाचा हसवासच वाटलं नाही,
तू नसशील त्या ठिकाणी असावासच वाटलं नाही.

अस्वथ नजर बिनधास्त होती सैरभर फिरताना,
भीतीच नव्हती तू बघण्याची चोरून तुला बघतांना

सारं काही तेच,तिथेच, तसंच होतं जसं आधी,
जिवंतपणाचा  अभाव सारा त्यांचा श्वासही तुलाच शोधी.

तुझ्यातल्या ऊर्जेमुळे निर्जीवातही चैतन्य धारण होतं,
आज सारं असून नसण्याला तुझी गैरहजेरी कारण होतं.

.............अमोल

केदार मेहेंदळे

कंटाळून तू  झिडकारते नको असलेली गोस्ट एखादी,
कंटाळ्यालाही गम्मत यावी तू लडिवाळपणे झिडकारल्याची.

अस्वथ नजर बिनधास्त होती सैरभर फिरताना,
भीतीच नव्हती तू बघण्याची चोरून तुला बघतांना

mast lihilyaa aahet hyaa oli.

mahantesh

apratim kavita....baryach divsat, konala tari reply karavasa watala..

Rahul Deshpande

GANESH911

विक्रांत

तुझ्यातल्या ऊर्जेमुळे निर्जीवातही चैतन्य धारण होतं,
आज सारं असून नसण्याला तुझी गैरहजेरी कारण होतं.
छान