ते हॉस्पिटल मधले दिवस- २

Started by amoul, December 23, 2012, 11:39:34 PM

Previous topic - Next topic

amoul

चेहरे नव्हते जरी ओळखीचे पालखीचे,
समदुखाने बांधले नाते एका तळमळीचे.

दुख्खीतांच्या मेळ्यातला  झालो वारकरी,
कधी वर्णिली दुखे कधी झालो टाळकरी.

दुख्खीतांच्या मेळ्यांत  मी दुखाची ओवी गाईली,
काही दुखऱ्या पापण्यांत मी साक्षात पंढरी पाहिली.

अदखलपत्र होते दुख्ख एकमेकांचे एकमेका,
तरी जात होत्या कनवाळू मुखातून हाका.

धीर द्यावा कुणी कुणास सारे होते खचलेले,
ज्याच्या त्याच्या नशिबी दुख्ख भयाण रचलेले.

ज्याचे त्याचे प्राक्तन सजे भिन्न व्यथेच्या नक्षीने,
काही क्षणांस्तव झालो एक व्यथालयाच्या साक्षीने.

दुख्ख संचित संपता तिथे राहण्यास अधिकार नसतो,
वंदन माझे त्या तीर्थाला जिथे सुख्खाच धिक्कार असतो.

निघण्याची वेळ झाली दूर झाली पाउले,
उंच कट्ट्यावरून पाहती दोन डोळे किलकिले.

...........अमोल

केदार मेहेंदळे


santoshi.world

hospital madhye tu admit hotas ka? ....tarich halli mk var tuzya kavitanchya post nhavatya .... ata kasa ahes? .......... mi pan ekda hospital madhye admit hoti 1 week...tyavelachya mazya feelings same ahet tuzya kavitesarkhya... kavita vachun te divas athavale...

amoul

mi nahi baba admit hote........ 15 days brain tumer.......... devachya dayene aata bare aahet.....

santoshi.world

ओह्ह्ह्ह .... बापरे .... साधा ट्युमर होता कि इतर कसला? .... हम्म्म देवाची कृपा पण असते तशी थोडी पण घरातल्यांचे उदास, चिंताग्रस्त आणि  काळजीने भरलेले डोळे आणि चेहरे बघितले कि बरं व्हावच लागतं आजारी पेशंट ला :) ....

amoul

sadha tumer hota.

kavitanni khup saath keli... tya divasat.