आदी शक्ती..जागृत हो

Started by balrambhosle, December 31, 2012, 08:53:33 PM

Previous topic - Next topic

balrambhosle

आदी शक्ती..जागृत हो

बघुनी हे घोर पाप..
मावळेल तो सूर्य आज..
आणि चंद्राला पण वाटतेय लाज..

हे माते ..
नवं सूर्याला जन्म देणारी तू
तू जन्म दे असा ..
ह्या राक्षसी देहाचा नाश
करणारा पडूदे आता प्रकाश.
आणि चंद्राची हि शीतल छाया
जाळु दे या काम भुंग्यांची काया

भोगलीस तू सहस्त्र दुखं
हरवून जन्माचं सुख..

खूप केलंस तू सहन..
कर आता या रावणाच दहन..

राम बनून येणारी पुरुषे
आता रावण झाली आहेत..
हनुमानाच्या आणि वानराच्या जागा आता
ह्या भ्रष्ट नेत्यांनी घेतल्या आहेत

म्हणून हे माते ..
तूच दुर्गा तूच काली
तूच आहेस आता या धरित्रीचा वाली..
जागृत कर तुझी आदी शक्ती..
तिची परब्रम्ह पण करतात भक्ती..

तुझ्या पोटी जन्माला येणारा प्रत्येक पुत्र.
दे त्याला मात्र रक्षणाच एकंच सूत्र..
छत्रपतींची ची खडग आणि विवेकानंदांचे विचार..
घेऊन करेल तो नष्ट ह्या दुष्टांचा अत्याचार

हे माते!
नवं वर्षाच  नवं युग जन्माला येवुदे..
आणि हे वासनेन भारलेल कलयुग आता जावुदे.

बळीराम भोसले