हरकत नाही...

Started by GANESH911, January 03, 2013, 06:02:32 PM

Previous topic - Next topic

GANESH911

हरकत नाही....
"अक्षर छान आलंय यात"
माझी कविता वाचतांना
मान तिरकी करत
ती एवढंच म्हणते...

डॊळ्यात तुडुंब भरलेली झॊप
कपाळावर पेंगत बसलेले काही भुरटे केस
निसटुन गेलेली एक चुकार जांभई
आणी नंतर
वाचता वाचता मध्येच
आपसुक मिटलेले तुझे डोळे
कलंडलेली मान
आणी हातातुन अशीच कधीतरी निसटलेली
माझी कवितांची वही

हरकत नाही,हरकत नाही
कविता म्हणजे तरी आणखी काय असतं !!

संदीप खरे