ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता

Started by GANESH911, January 06, 2013, 06:04:40 PM

Previous topic - Next topic

GANESH911

ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता
मेघात अडकलेली किरणे हा सुर्य सोडवित होता

तशी सांज आमच्या दारी येऊन थबकली होती
शब्दात अर्थ उगवावा,अर्थातुन शब्द वगळता

ती आई होती म्हणुन घनव्याकुळ मी ही रडलो होतो
त्या वेळी वारा सावध पाचोळा उडवित होता

अंगणात गमले मजला संपले बालपण माझे
खिडकीवरती धुरकट तेव्हा कंदिल एकटा होता

हे रक्त वाढतांना ही मज आता गहीवर नाही
वस्त्रात द्रोपदीच्याही तो कृष्ण नागडा होता

कविवर्य ग्रेस