तुला विसरण्यासाठी....

Started by प्रशांत नागरगोजे, January 11, 2013, 02:02:32 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

तुला विसरण्यासाठी पित असतो
तोल सावरत-सावरत चालत असतो
तुझ्यासोबतचे क्षण आठवत असतो
तुझा राग येतो म्हणून मीच रडत असतो 

तुला विसरण्यासाठी गात असतो
मनातील वेदना ओरडून सांगत असतो
वाटतं तू ऐकशील पण मीच फसत असतो
तुझा राग येतो म्हणून मीच रडत असतो 

तुला विसरण्यासाठी मी शांत एकटा असतो
पाणावलेल्या डोळ्यांत तुझाच चेहरा असतो
विसरण्यासाठीच तुला आठवत असतो
तुझा राग येतो म्हणून मीच रडत असतो

तुला विसरण्यासाठी तळमळत असतो
तुझ्याविना जगण्याची स्वप्ने रंगवत असतो
तितक्यात कुठूणतरी तुझी आठवण येते
मी रंगवलेल्या स्वप्नांची राखरांगोळी करून जाते
तुझा राग येतो म्हणून मीच रडत असतो
 
-आशापुञ


Shrikant R. Deshmane

Lai bhari prashantji..
Apratim kavita..
Tumchya, kedarji, sadhana ji, sanjayji aani etar kavichya kavita vachlya ki maza ardha aayusya tumhi rekhatlay asa vatata..
Ha mi kadhi kunavar prem nhi kela ajun pn kavitanchya bhavnatun feel karta yeta ki tyachi situation kay asavi...
Thnk u...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

प्रशांत नागरगोजे

DHANYAVAD SHRIKANTJI, TUMCHYA PRATIKRIYEBADDAL MANAPASUN ABHAR....AS KONI MOTIVATE KEL TAR AJUN KAVITA LIHU VATATAT......