बंडखोरी

Started by amoul, January 13, 2013, 12:40:47 PM

Previous topic - Next topic

amoul

अनावर भाव मनीचा,
झरा होऊन वाहे उत्कट.
नियमांच्या तोडून तारा,
पक्षी उडाले सोडून चौकट.

संयमाच्या गुंफेतला तो,
तपस्वी मनस्वी कोणी.
सोडून ध्यान लीन होऊनी,
ऐके घुंगुर नाद कानी.

त्या क्षणाचे मेण वितळता,
नजर अख्खी शर्मेत न्हाली.
मन पुरती झुकली होती,
आदर्शाच्या ओझ्याखाली.

बगवतीची तलावर तळपली,
परंपरेच्या पहाऱ्यावरती.
एक नव्याने वाट मिळाली,
भरकटलेल्या आयुष्यापुरती.

..........अमोल

Rohit Dhage

hi amol... i request u plz give me ur email id.. m damn fan of ur poems.. :)

प्रसाद पासे

mast ahe kavita...

मन पुरती झुकली होती,
आदर्शाच्या ओझ्याखाली.

he kadava farach chhan...

केदार मेहेंदळे