तिच्यावर खुप प्रेम करावेसे वाटतेय...

Started by Ankush S. Navghare, Palghar, January 18, 2013, 11:56:22 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

एकाकी खूपच जगलो
आता तिच्यासोबत जगावेसे वाटतेय
तिच्यावर खुप प्रेम करावेसे वाटतेय...!!१!!

प्रेम ठरवून होत नाही
तरीही ठरवावेसे वाटतेय
तिच्यावर खुप प्रेम करावेसे वाटतेय...!!२!!

ती कुठेतरी दूर आहे
माझ्यावर रागावली आहे
ती बोलणार नाही
तरी तिच्याशी बोलावेसे वाटतेय
तिच्यावर खुप प्रेम करावेसे वाटतेय...!!३!!

तिचे खुप मित्र आहेत
तिला माझी गरज नाही
मला पाहून ती कधी
खोटे सुद्धा हसत नाही
ती हसणार नाही तरी
तिच्याकडे पाहून हसावेसे वाटतेय
तिच्यावर खुप प्रेम करावेसे वाटतेय...!!४!!

ती खूपच busy असते
तिला रिकामी वेळच नसते
जरी ती भेटणार नाही
तरी तिला भेटावेसे वाटतेय
तिच्यावर खुप प्रेम करावेसे वाटतेय...!!५!!

तिचे नाव काय मला माहित नाही
कुठे राहाते त्याचा तर पत्ताच नाही
माझ्या ह्या अजाणतेपणावर
मला आता रडावेसे वाटतेय
तिच्यावर खुप प्रेम करावेसे वाटतेय...!!६!!

जेव्हा जेव्हा तिला आठवतो
ती हळूच समोर येते
मग समजते हे स्वप्न आहे
आणि स्वप्न भंग होते
भंग झालेल्या स्वप्नातच
परत परत रमावेसे वाटतेय
तिच्यावर खुप प्रेम करावेसे वाटतेय...!!७!!

जेव्हा ती खरच येते
वाटते तिला सर्वकाही सांगावे
बोलण्यास मात्र मन घाबरते
तरीही परत तेच तेच धाडस
करावेसे वाटतेय
तिच्यावर खुप प्रेम करावेसे वाटतेय...
तिच्यावर खुप प्रेम करावेसे वाटतेय...!!८!!

.... प्राजुन्कुश
.... Prajunkush.


Ankush S. Navghare, Palghar


Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Ankush S. Navghare, Palghar



Ankush S. Navghare, Palghar