असा कसा तू माणूस ......

Started by SANJAY M NIKUMBH, January 19, 2013, 06:41:22 AM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

असा कसा तू माणूस ......



कथनी वेगळी

अन करणी वेगळी

असा कसा तू माणूस

भाव वेगळा

रंग वेगळा

असा कसा तू माणूस 

शब्द तुझे

तू न पाळी

असा कसा तू माणूस 

माणसालाही

जिवंत जाळी

असा कसा तू माणूस 

सरड्या सारखे

रंग बदलतो

असा कसा तू माणूस 

खोटे वागून

कुणाही फसवतो

असा कसा तू माणूस 

भक्ती देवाची

वर्तणूक राक्षसी

असा कसा तू माणूस 

स्वतःच्या आत्म्यास

न ओळखशी

असा कसा तू माणूस 

उंबरठ्यावर मरण तरी

सुटे ना हाव

असा कसा तू माणूस 

वाईट कर्म करूनही

म्हणे देवा पाव

असा कसा तू माणूस 

देवालाही

लाच दे शी तू

असा कसा तू माणूस 

बाईची अब्रू

वेशींवर टांगशी

असा कसा तू माणूस 

तूच ठरव माणसा

कां म्हणू

तुला माणूस

चिंता मज याची

तू

कधी होशील माणूस .



                                  संजय एम निकुंभ , वसई

                                दि. १८.०१.१३ वेळ : ९.०० स .