नकोत क्षणाची निदर्शने

Started by amoul, January 20, 2013, 04:33:26 PM

Previous topic - Next topic

amoul

पुन्हा झाली तेच कृत्य,
पुन्हा झाली तशीच हत्या.
चल करुया निदर्शने,
चल जळूया मेणबत्त्या.

आपल्यातलच मरतंय कुणी,
म्हणून हि निदर्शने.
निर्ढावलेल्या वृत्तीसमोर,
हि हतबलतेची प्रदर्शने.

द्रौपदी मोठी भाग्यवान,
भगवंत वेळीच धावला.
आज "ती"च्या हाकेसाठी,
देवाला नसेल वेळ फावला

शेकडो मेणबत्त्या विझल्यावर,
परत उरते रात्र काळी .
त्यापेक्षा एकेकीने जळावं,
प्रत्येक अश्या संध्याकाळी.

वणवा पेटतो क्षणात विझतो,
राखेस उरते किंमत शुन्य.
नकोत क्षणाची निदर्शने,
सुरु करूया महायज्ञ

..........अमोल

santoshi.world


प्रशांत नागरगोजे

kavita chaan ahe....mahayadhnya karayacha mhanje nemak kay karayach? he jara sangital pahije jagala....karan prashnachi uttare sodhanyasathi halli koni jast vichar karat nahi....tyat menbattya jalne sope mhanun barech jan fakt tech kartat....BHARATALA JAGE KARUN MARGA DAKHAWALA PAHIJE...

केदार मेहेंदळे