मोकळा कॅनवास.

Started by amoul, January 20, 2013, 05:25:32 PM

Previous topic - Next topic

amoul

किती चाललो तरी,
संपेना हा प्रवास.
सरत आले रंग तरी,
मोकळा कॅनवास.

किती कवड्या जमवल्या,
कितीतरी गमावल्या.
खर्चूनही न संपल्या,
तरी भुकेलेला हव्यास.

किती झेलले पावसाळे,
कितीतरी उन्हाळे सोसले.
किती पिढ्या राहू उभा,
प्रश्न हा या घरास.

अज्ञात मुखाचे वेद,
त्यातही भेदाभेद.
जगण्याचा धर्म डावलून,
का जीवघेणा निजध्यास.

निर्मात्याची उत्तम कल्पना,
म्हणजे माणसाची रचना.
तरी कुठे झाली चूक.
हा प्रश्न ईश्वरास.

निसर्गाची रोज एक,
नित्यनवी छटा सुरेख.
स्वतास भिन्न समजल्याने,
उपेक्षेची शिक्षा अस्तित्वास.

प्रत्येकास असे प्रदान,
पूर्णत्वाचे वरदान.
फाटक्या ओंजळीमुळे,
जडले अपूर्णत्व नशिबास.

..........अमोल

GANESH911


केदार मेहेंदळे