तू येतोस ...........

Started by SANJAY M NIKUMBH, January 29, 2013, 10:31:22 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

तू येतोस ...........

तू येतोस

अन माझ्या ओंजळीत

सुखाचे

चांदणे भरतोस

तुझा सळसळणारा उत्साह

माझ्या

रोमारोमांत भिनवतोस

तू येतोस

अन तुझा प्रीतगंध

माझ्या

नसानसांत भरतोस

पहिल्या पावसाच्या गंधासम

माझ्या मनास तो

वेड लावतो

तू येतोस

अन माझ्या वेदनांना

मला

विसरायला लावतोस

तुझ्या डोळ्यातली प्रीत

जातांना

उरांत ठेवून जातोस

तू येतोस

अन माझं जगणं

बेधुंद

करून टाकतोस

मी आहे तुझा

असं नजरेनच सांगून

माझ्यात तू वहातोस .

संजय एम निकुंभ , वसई

दि. २५.१.१३ वेळ : ७.३० स.