फक्त तूच आहेस...

Started by Ankush S. Navghare, Palghar, January 31, 2013, 09:42:42 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

तु खुप दूर आहेस
पण तुझा भास तर आहे
एकाकी का असेना
जगण्याची आस तर आहे
तु दूर असलीस तरी
प्रेमाची एक आठवण पुरते
एका क्षणाची भेट
जन्माची शिदोरी ठरते
तु खुप दूर आहेस
पण तुझी आठवण तर आहे
माझ्या हृदयात तुझ्या प्रेमाची
साठवण तर आहे
तु दूर असलीस तरी
तु जवळ असल्याचाच भास
इतर नात्यांहून वेगळा
हाच तर प्रेमाचा ध्यास
तु खुप दूर आहेस
पण तुझी ओढ तर आहे
माझ्या प्रेमाला तुझ्या प्रेमाची
जोड तर आहे
तु दूर असलीस तरी
काही फरक पडत नाही
तुझ्या दूर राहण्याने
आपले प्रेम रडत नाही
तु खुप दूर आहेस
तुला पाहणे अशक्य
कितीही प्रयत्न केला तरी
तुला विसरणे अशक्य
तु दूर असलीस तरी
माझ्या मनात तर आहेस
जिथे तुझ्याशिवाय कुणी नाही
त्या माझ्या हृदयात तर आहेस
तु खुप दूर आहेस
पण तुझेच सारे अस्तित्व
माझ्या प्रत्येक क्षणांत
तुझेच तर वास्तव्य
तु दूर असलीस तरी
माझ्या प्रत्येक कवितेत 
माझ्या प्रत्येक श्वासात
फक्त तूच आहेस...
फक्त तूच आहेस...

... प्राजुन्कुश
... Prajunkush


केदार मेहेंदळे


kuldeep p

Mast mitra
keep it up ...
i miss her so much

Ankush S. Navghare, Palghar

Kedar sir, Prajdeep...
... Khup abhar agadi manapasun.

mansi arakh


Ankush S. Navghare, Palghar

Manasiji...
... Khup abhar agadi manapasun. Mihi hyache uttar shodhatoy.

Mayaa

Kharch itak miss karta ka tila? ki fakt kavitetunch prem vyakta karta. karan kharya premachi kadar kuni karat nahi.