मन माझे विसावते

Started by Sadhanaa, February 10, 2013, 11:40:24 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

मन माझे विसावते 
   आठवणींच्या जगतांत
अन मिटलेल्या नेत्रांत 
   स्वप्नं ती साकारतात ।
हळूच येऊनि स्वप्नांत
   चाळविशी माझी निद्रा
आसुसते मन माझे
   पाहण्या तव हंसरी मुद्रा ।
हळूच उघडून पापण्या
   दृष्टि भीर-भीर फिरते
अंधारावाचून भोंवती 
   कुणीच दुसरे नसते ।
नैराश्याने मिटून घेतो 
   नेत्र माझे पेंगाळलेले
येऊनि पुन्हा स्वप्नांत भाव
   चाळविशी चाळवलेले ।
पाठशिवणीचा खेळ असा 
   कां माझ्या संगे खेळशी
स्वप्नामध्ये येउनि कां
   जागेपणी निघून जाशी ।
जीवनीं एक असताना 
   दूर कधीं झाली नव्हतीस
जीव घेणा खेळ असा 
   चुकूनहि खेळली नव्हतीस ।
दूर जाहून सुखाचा 
   घांस तो काढून घेतलास
स्मृतिरेखा चाळविण्याचा
   खेळ कां आरंभलास ।
किं जीवनीं असे कांही
   दुःख तूं भोगले होतेस
सूड त्याचा घेण्यासाठी
            स्वप्नीं येऊन
            निघून  जातेस ।। रविंद्र बेंद्रे 
         

कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this

http://www.kaviravi.com/2013/02/love-poem.html

Ankush S. Navghare, Palghar