आम्ही अशी फुले ....Audio

Started by Sadhanaa, February 11, 2013, 08:58:15 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

आम्ही अशी फुले की 
   बाजार पाहिलेली
येऊन बाजारी परि 
   निरपेक्ष राहिलेली ।
घेण्यास विकत आम्हा 
   येतो कधीं कुणीही
हुंगून क्षणभराने 
   फेंकून देतो कुठेही ।
येते कधीं सुनयना 
   कुरवाळीते ती आम्हा
मिरविते ती दिमाखे 
   घेऊनि संग आम्हा ।
येतो कधीं कुणी 
   भक्ती भावे विकत घेतो
हळुवार त्या कराने 
   देवास तो वहातो ।
पण एक दिन जीवनी
   आमच्या असा येतो
निर्माल्य होऊनि तो   
   सरीतेत झेंप घेतो ।
येतो कधीं कुणी आम्हा
   विकत घ्यावयाला
प्रेतावरी आदराने 
   आम्हास वाहण्याला ।
प्रेतावरी पडुनि आम्ही 
   रुदन मुके करतो             
त्याच्यासवे अखेरी
   आमुचाच अंत बघतो ।।
रविंद्र बेंद्रे

कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this

http://www.kaviravi.com/2013/02/miscellaneous.html

केदार मेहेंदळे


Madhura Kulkarni

व्यथा कवितेतून छान व्यक्त झाली आहे.