कविता (गझल)

Started by प्रसाद पासे, February 18, 2013, 04:50:46 PM

Previous topic - Next topic

प्रसाद पासे

कवितेतून स्वतःला शोधायला लागलो
कवितेतून स्वतःला समजायला लागलो

अस्तिकेचि शब्दफुले वेचायला लागलो
कवितेतून अता त्यास स्मरायला लागलो

जगण्याची गणिते मी न चुकायला लागलो
कवितेतून सारे जग पाहायला लागलो

जगण्यातील चुका मी मोजायला लागलो
कवितेतून व्यथा मी मांडायला लागलो

इतक्यात कुठे मी मस्त जगायला लागलो
कवितेतून स्वतःला अजमायला लागलो

अक्षरांतच इतुका मी हरवायला लागलो
कवितेतून स्वतःला गवसायला लागलो

अक्षरांच्या दुनियेतच राहायला लागलो
कवितेतच अता मी जणु रमायला लागलो

प्र. रा. पासे

केदार मेहेंदळे