कधीच प्रेम नाही केलं .........

Started by SANJAY M NIKUMBH, February 24, 2013, 03:47:09 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

कधीच प्रेम नाही केलं .........

-----------------------------

खंर तर मी तुझ्यावर

कधीच प्रेम नाही केलं

कधी प्रेम करेल

असं मनात नाही आलं

तुझे टप्पोरे डोळे

मला वेड लावत गेले

मी पाहत गेलो

न मन वहात गेले

त्या सुंदर डोळ्यांनीच

तुझा गुलाम केलं

तुला उगीच वाटत

मी प्रेम केलं

लांब सडक केस तुझे

मला आवडत गेले

त्या कुरळ्या केसांत

मन हरवत गेले

कधी घालून अंबाडा

तू मला छळलं

तुला उगीच वाटत

मी प्रेम केलं

तुझे ओठ गुलाबी

नशीला करत गेले

मधुर गंधान मनास

रंगीला करत गेले

त्या मुलायम पाकळ्यांनी

मला भ्रमर केलं

तुला उगीच वाटत

मी प्रेम केलं

इतकं सौंदर्य पाहूनही

मन नाही अडकलं

गुंतलेल्या मनास

मी होतं सावरलं

पण सुंदर मन पाहून

मन तुझं झालं

तुला उगीच वाटत

मी प्रेम केलं

शप्पथ सांगतो प्रिये

कधीच प्रेम नाही केलं 

तू होतीसच अशी की

काळीज तुला दिलं .



                                     कवी : संजय एम निकुंभ , वसई

                                    दि. २४.०२.२०१३  वेळ : २.४५ दु .






[/size]