ते म्हणजे बाप अन् आई.

Started by Vikas Vilas Deo, February 25, 2013, 04:58:59 PM

Previous topic - Next topic

Vikas Vilas Deo

बाळा भरवितात घास
स्वतः राहुन उपाशी,
ते म्हणजे बाप अन् आई.

मुलांना शिकवी
रक्ताची करुनी शाई,
ते म्हणजे बाप अन् आई.

बाळाचे लाड पुरवी
स्वतःच्या इच्छांना देवुन फाशी,
ते म्हणजे बाप अन् आई.

स्वतः जमिनीवर झोपी
बाळा देवून गादी,
ते म्हणजे बाप अन् आई.

बाळा ठेवण्या सुखी
स्वतः दिस रात कष्टी,
ते म्हणजे बाप अन् आई.