वाटेल का तुलाही पुन्हा भेटावेसे जरासे.........?

Started by Er shailesh shael, February 25, 2013, 07:50:47 PM

Previous topic - Next topic

Er shailesh shael

अलगुज मनातील बोलून जातील जरासे....

त्या गप्पांमधे दोन जीव जातील रमून जरासे....

वाटेल का तुलाही पुन्हा भेटावेसे जरासे...........?

तुला बघताना वाटेल मला तुही बघावेस माझ्याकडे जरासे....

किंचित नजर वर करून बघशील तू वाटेल पुन्हा झुकवावे

नजरेचे कवडसे जरासे.....

वाटेल का तुलाही पुन्हा भेटावेसे जरासे........... ?

नको नको म्हणताना तुला ही वाटेल थांबावेसे जरासे.....

वाटेल क्षण सारे इथेच स्तब्ध व्हावे जरासे.......

वाटेल का तुलाही पुन्हा भेटावेसे जरासे........... ?

एकमेकांना डोळ्यात साठवूनही

वाटेल अजुन थोडेसे उरावे एकमेकांजवळ जरासे....

हातांच्या ओंजळीत साठवलेले सोनेरी उन

तुझ्या ओंजळीत रीते करावे जरासे........

वाटेल का तुलाही पुन्हा भेटावेसे जरासे...........?

जाताना मग गुंफलेले हातामधले हात गुंतुन राहतील जरासे

पुन्हा भेटण्याचे वचन देऊन जाशील का जरासे........?

वाटेल का तुलाही पुन्हा भेटावेसे जरासे.........?
                                                  ------पाउसवेडा