ध्यास

Started by kumudini, February 28, 2013, 09:15:43 PM

Previous topic - Next topic

kumudini

ध्यास
कुमुदिनी काळीकर

दर्शनाचा ध्यास ---लागो दॆवा मला
पंढरीची वाट ---चलारे पाऊला
दिंडी माउलीची ---वाहतो मी भोई
अंतरी नांदतो --- आनंदी आनंद
देवा तुझे पाय ----- थकले न काय
दिनरात उभा ---- राहे विटेवर
पहिले चरण ---- पावता मंदिरी
नेत्री आसवाच्या -----सरी एक सरी
दयेच्या अर्णवा ---- रखुमाई वरा
दर्शनाने तुझ्या ----जन्म धन्य झाला



केदार मेहेंदळे


विक्रांत

छान भावना .पण अभंग  form मध्ये लिहाल तर छान वाटेल.६-६-६-४  यमक २री ३ री ओळ .

माझ्या तुकोबाचे l बोल करुणेचे
भरले दयेचे l कृष्णमेघ ll १ ll
शब्दो शब्दी असे l शुद्ध कळकळ l
व्हावेत सकळ l सुखी इथे ll २ ll